बीड जिल्ह्यातून सहा पैकी तीन जागांवर ठाकरे गटाचा दावा
बीड जिल्ह्यातून तीन आमदार निवडून आणण्याचा निर्धार
खोकेवाल्याना जनताच घरी बसवणार-खा संजय राऊत
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातून 3 आमदार ठाकरे गटाचे असतील त्यामुळे जागा वाटपात 3 जागा आम्हाला हव्यात आहेत,बीड किंवा माजलगाव आणि गेवराई व केज मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विधानसभा लढवणार असल्याचे महाप्रबोधन यात्रेत जाहीर घोषणा करण्यात आली आहे
या सभेत शिवसेनेचे प्रवक्ते खा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर टिका केली.तर कर्नाटक राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 37 सभा आणि 27 रोडशो केले मात्र त्यानंतरही तेथील जनतेने मोदींचा दारूण पराभव केला. राज्यातही अशीच परिस्थिती पहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी निवडणूकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा फोटो लावून निवडून यावे, मी राजकारण सोडतो अशी घोषणा खा.संजय राऊत यांनी बीडमध्ये जाहीर सभेतून केली.बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता, तुमच्यात धमक असेल तर तुम्ही निवडून या, तुम्हाला बाळासाहेबांच्या फोटोशिवाय काय किंमत आहे, ही महाराष्ट्राची जनता दाखवून देईल असे ते म्हणाले.
बीडच्या माने कॉम्प्लेक्स समोरी, पारसनगरीमध्ये
शिवसेनेची जाहीर सभा शनिवारी रात्री पार पडली.या सभेला जिल्हाभरातून शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी सुषमा अंधारे,चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यावेळी संजय राऊत यांनी जेव्हा महाप्रबोधन यात्रा सुरू झाली, तेव्हा मी तुरुंगात होतो आज मी बीडमध्ये या यात्रेसाठी उपस्थित राहिलो याचा प्रचंड आनंद वाटत असल्याचे सांगितले.
बीडची महाप्रबोधन यात्रा नव्हे तर विजय यात्रा असल्याचे मला जाणवले. शिंदे सरकारने सामान्यांसाठी’आनंदाचा शिधा’ आणला. या शिध्यातून गोरगरीबांना 1किलो साखर, 1 किलो चणादाळ, 1 लिटर पामतेल दिले.सामान्यांना आनंदाच्या शिधातून असले हलक्या वस्तू
देत स्वतःला मात्र 40-50 कोटी रुपये भाजपकडून घेतले आणि सेना फोडली. आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2022 चे अजुनही अनुदान मिळाले नाही, मी आज महाप्रबोधन यात्रेसाठी आल्यानंतर मला येथील शेतकऱ्यांनी निवेदन देवून आमच्या अनुदानाचं बघा अशी मागणी केली.हे सरकार नेमकं करतयं काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.
महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्हिडीओतून पोलखोल केली.
बीडमध्ये सुषमा अंधारेंनी मोदी आणि फडणवीसांचा व्हिडीओच्या माध्यमातून समाचार घेतला.यावेळी त्यांनी मोदींच्या घोषणा आणि फडणवीसांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती लावत हे दोन्ही नेते किती खोटारडे आहेत हे जनतेच्या समोर आणले. यावेळी अंधारे यांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिका केली. तुम्ही 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत बससेवेचा लाभ दिला,महिलांना अर्धे तिकीट सुरू केले मात्र ते आम्हाला नकोय, तुम्ही त्यापेक्षा 1250 चा गॅस 300 रुपयांना द्या,सामान्यांची ती मागणी आहे.असे सांगून त्यांनी शिंदे गटावर चौफेर हल्ला केला
जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सभा यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली यामुळेच जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते,बीड जिल्ह्यातून सहा पैकी 3 आमदार निवडून आणायचे आहेत यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आतापासूनच तयारी करावी असे आवाहन केले,