सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पगारात वाढीव DA सह पगारवाढही मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता (DA) वाढीची आतुरतेने वाट पाहतात. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या काही महिन्यांत चांगली बातमी मिळणार आहे. यंदाही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ होईल. महागाईच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या आपल्या कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून दोनदा सुधारित करते. पहिला जानेवारीपासून तर दुसरा जुलैपासून लागू होतो. जानेवारी २०२३ पासून लागू झालेली DA वाढ सरकारने मार्च २०२३ मध्ये जाहीर करत त्यात ४% वाढ केली आणि एकूण DA ४२% झाला आहे.
महागाई भत्ता किती वाढणार?
महागाईच्या वाढीनुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो. औद्योगिक कामगारांच्या महागाईच्या आकडेवारीच्या आधारे DA वाढीची गणना केली जाते. तर कामगार मंत्रालयाचे कामगार ब्युरो अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (औद्योगिक कामगार) डेटा जारी करते. AICPI निर्देशांकाच्या मार्च महिन्यातील महागाईचे आकडे आले असून तीन महिन्यांचे आकडे आले असून शिल्लक तीन महिन्यांचे आकडे जाहीर होईल. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता २.५ टक्क्यांनी वाढवायला हवा. तर संपूर्ण सहा महिन्यांची आकडेवारी समोर आल्यानंतर महागाई भत्ता वाढीची गणना केली जाईल. सूत्रांनुसार जुलैपासून महागाई भत्ता ४% वाढू शकतो.
जुलैपासून लागू होणार्या महागाई भत्ता वाढीला सप्टेंबरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यानंतर कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार DA वाढीसह मिळेल. त्याचबरोबर थकबाकी देखील दिली जाईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४२% महागाई भत्ता दिला जातो, ज्यात आणखी ४% संभाव्य वाढीनंतर ४६% होईल. २४ मार्च रोजी केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ३८% वरून ४२% पर्यंत वाढवला होता.