देशनवी दिल्ली

भारताच्या नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्धाटन

सध्या संसदेची नवीन बांधलेली इमारत जिथे भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करण्याचे आणखी एक काम केले जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला असून 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्धाटन होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली आहे.

संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेतील 550 तर राज्यसभेत 250 सदस्यांची बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संसदेच्या नवीन बांधलेल्या इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहातच होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या नवीन संसद भवनाची इमारत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने तयार केली आहे. 26 मे रोजी मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत.

ही नवीन संसद भवन चार मजली असून जर आपण त्याची महत्वाची ही वैशिष्ट्य आहेत की हांते 970 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे.

64 हजार 500 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या नवीन संसद भवनाला 3 मुख्य दरवाजे आहेत. त्यांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावे देण्यात आली आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे लोकप्रतिनिधींना त्यांची कामं अधिक चांगल्या पद्धतीने करता येतील.

कशी असणार आहे संसदेची नवी इमारत?

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील
लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था
सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत, नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक
या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल
याशिवाय 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *