कंटेन्मेंट झोन वगळता अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल; हॉटेल्स, मॉल्स सुरू होणार नाही; अधिसूचना जारी
लॉकडाऊन सुरू करतानाच राज्य सरकारने तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता जॉगिंग, व्यायाम, सायकलींग करता येणार असून गार्डनमध्ये जाता येणार आहे. तसेच इलेक्ट्रिशियन्स, गॅरेज आणि पेस्ट कंट्रोल आदी गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कंटेन्मेंट झोन वगळता सरकारी कार्यालयेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र हॉटेल, मॉल्स सुरू करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही.
केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली असून येत्या ३० जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मात्र लॉकडाऊन सुरू करतानाच राज्य सरकारने तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता जॉगिंग, व्यायाम, सायकलींग करता येणार असून गार्डनमध्ये जाता येणार आहे. तसेच मार्केट, इलेक्ट्रिशियन्स, गॅरेज आणि पेस्ट कंट्रोल आदी गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कंटेन्मेंट झोन वगळता सरकारी कार्यालयेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र हॉटेल, मॉल्स सुरू करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने ३ जून, ५ जून आणि ८ जूनपासून काही गोष्टींना सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ३ जूनपासून उद्यानात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली, व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही ग्रुप अॅक्टिव्हिटी करण्यास मनाई करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांना जवळपास प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र लांब प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खुल्या मैदानात गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
त्याशिवाय ३ जूनपासून प्लंबर, इलेक्ट्रेशियन, पेस्ट कंट्रोल, आणि इतर टेक्निशियनच्या कामास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि मास्क लावणं बंधनकारक केलं आहे.