वायदे बाजार सुरू;महिन्याभरात पुन्हा कापसाचे भाव वाढणार
शेतकऱ्यांच्या दृष्टीने “पांढरे सोने’ अशी ओळख असलेल्या कापसाचा वायदे बाजार (स्पॉटमार्केट) सुरू झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात कापसाचा खरेदीदर वाढत असले, तरी ते मागील वर्षीच्या तुलनेत कमीच राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
वायदे बाजार सुरू झाल्यानंतर आता कापसाची दरवाढ होत आहे. 17 फेब्रुवारीला कापसाचे दर 7,981 रुपये प्रती क्विंटल इतके होते. सध्या दर्जानुसार क्विंटलमागे सरासरी 8,400 रुपयांचा भाव कापसाला मिळत आहे. एप्रिलपर्यंत हे भाव 9 हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, 13 फेब्रुवारीला वायदे बाजार सुरू झाले आहेत.
दरम्यान, एप्रिलपर्यंत कापसाच्या प्रती गाठीचा दर 63 हजार रुपयांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. ही स्थिती प्रत्यक्षात आल्यास भारतात कापसाचे दर 8,500 ते 9 हजार रुपये किंवटलदरम्यान राहतील. पण, यातून शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नसल्याची स्थिती आहे.
भारतात सध्या कापसाचे दर तुलनेने स्थिर आहेत. येत्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या दरात कापूस निर्यातही सुरू झाली. सुतगिरण्याही 85 ते 90 टक्के क्षमतेने सुरू झाल्या असून, त्यांना नफाही होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव टिकून आहेत. त्यामुळं देशातील कापूस बाजारालाही आधार मिळू शकतो असे अतुल गणात्रा, अध्यक्ष,कॉटन असो.ऑफ इंडिया यांचे म्हणणे आहे