महाराष्ट्रमुंबई

ब्राह्मण समाजाच्या देवस्थान इनाम जमिनी वर्ग 1 होऊन खाजगी मालकीच्या होणार महसूलमंत्र्यांचे आश्वासन – परशुराम सेवा संघाच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : ब्राह्मण समाजाकडे असलेल्या इनाम जमिनी वर्ग 2 संवर्गातून वर्ग 1 संवर्गात बदल करण्यासाठी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे यांच्या मागणीला महसूलमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला असून दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी या संदर्भात एक बैठक महसूलमंत्र्यांच्या दालनात पार पडली.

या बैंठकीस जेष्ठ कायदेतज्ञ ऍड नरेश गुगळे भाजप अहमनगर जिल्हाध्यक्ष श्री भय्या गंधे राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री नितीन करीर उपसचिव श्री कोठेकर श्री मनोज पांगारकर यांच्यासह इनाम जमीन धारक सर्वश्री सुनील कुलकर्णी दीपक देवळे भगवान ठोंबरे सुधीर रामदासी अरुण गोसावी उपस्थित होते. यावेळी बोलताना महसूलमंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच त्यासंदर्भातील कायदा सभागृहात पारित केला जाइल असे आश्वासन दिले. त्यासोबतच इनाम जमिनींच्या वारस नोंदीसाठी स्वतंत्र परिपत्रक काढण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आजची बैठक सकारात्मक झाल्याचे मत परशुराम सेवा संघाने व्यक्त केले असून या कायद्याच्या माध्यमातून गेली 75 वर्षे होत असेल अन्याय दूर होईल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *