ऑनलाइन वृत्तसेवा

तीस वर्षांनंतर शनिदेव स्वगृही;कोणत्या राशींच्या भाग्याचे दार उघडणार!

शनी हा एक संथगतीने चालणारा ग्रह आहे. बारा राशींचा प्रवास पूर्ण करण्यास त्याला अंदाजे २९ वर्ष ६ महिने लागतात. तर शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काल अडीच वर्षाचा असतो.

१७ जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून वायुतत्वाच्या बौद्धीक कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे काही राशींना येत्या काळात एक वेगळी उर्जा प्राप्त होईल. आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. त्यामुळे आजच्या शनी गोचरने नेमक्या कोणत्या राशींच्या भाग्याचे दार उघडणार आहे हे पाहुयात..

मकर (Capricorn Zodiac)

शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. शनी धनु व मकरेत असताना जातकाला साडेसातीचा खूप त्रास होतो, पण शनी कुंभ राशीला प्रवेश करताच सारे चित्र बदलते. शनी स्वगृहीचा धनस्थानात त्यामुळे उद्योगधंद्यात नोकरीत स्थिरता लाभते. मानसन्मानाचे योग येतात. कामाचे विशेष कौतुक होते. पैसा गुंतवल्याने बऱ्यापैकी फायदा होतो. शेअर्स उद्योगातील गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरते. त्यात गुरुचा पराक्रमातील सहवास अधिक प्रोत्साहीत करून सुखाचे दिवस दाखवतो; मात्र अति दगदग टाळा.

कुंभ (Aquarius Zodiac)

स्वराशीत कुंभेत शनी येण्याआधी मकरेतील शनीमुळे साडेसातीचा कुंभ राशीला अडीच वर्ष नक्कीच त्रास झाला असेल. पण आता प्रत्यक्षात शनी कुंभ राशीत प्रवेश करीत आहे आणि हा शनी खूप लाभदायक ठरेल. बुद्धी प्रयत्न आणि श्रम यातून या राशीला उत्तम यश प्राप्ती होईल. या लोकांना शनीचा संयम शोधकवृत्ती नी उ्दयोगबुद्धी नैसर्गिक प्राप्त होईल. त्यामुळे आर्थक बाजू उत्तम राहील. त्यात धनस्थानात स्वराशीचा गुरु बोलण्यातून वागण्यातून आपली विद्वत्ता प्रदर्शित करेल. तर पराक्रमातील राहूची या शनीला उत्तम साथ लाभेल. त्यामुळे कुंभ राशीला हे वर्ष आनंदी व सुखाचे जाईल.

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीच्या व्ययात शनी त्यामुळे मीन राशीला पहिली साडेसाती चालू होईल पण शनीचे स्वराशीतील भ्रमण फारसे त्रासदायक ठरणार नाही पण काळजी घेणे आवश्यक ठरेल. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल त्यात होणारी आवक गोठेल व त्यातून चिंता प्राप्त होईल पण मूळात गुरु मीन राशीत स्वगृही असल्यामुळे खूपशा घटनांचे विपरीत परिणाम फारसे होणार नाहीत. तरी पैशाची बचत करून पैसे जपून वापरणे हा नियम स्वत:ला लावून घ्या. राजकारणात, सामाजिक कार्यात मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ नका. वचने आश्वासन देणे टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *