पोलीस पाटलांच्या रिक्त पदांची भरती होणार;माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीने जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात तसेच जिल्ह्यातील डोंगरी विभागांतर्गत गावांचे प्रस्ताव तात्काळ पाठवावेत संजय गांधी योजनेतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी आणि शेतकऱ्यांचे फेरफार प्रकरणे निकाली काढावे या सर्व समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकतीच जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांची भेट घेतली होती यासंदर्भात सविस्तर चर्चा करून पोलीस पाटलांची रिक्त पदे तात्काळ भरावी असा आग्रह माजी मंत्री क्षीरसागर यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी याबाबत भरती प्रक्रिया आदेश काढला आहे
बीड जिल्ह्यातील डोंगरी विभागाअंतर्गत राहिलेल्या गावांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत त्याचबरोबर जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात संजय गांधी श्रावण बाळ योजना बीड तालुक्याची नवीन समिती अस्तित्वात आल्याशिवाय बैठक घेऊ नये तसेच 2019 पासून ची जुनी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात याव्यात बीड तहसीलमध्ये बीड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे फेरफार प्रकरणे मंजूर करण्यात यावी, बीड जिल्ह्यातील 1600 पोलीस पाटलांच्या जागा आहेत परंतु प्रत्यक्षात 114 पोलीस पाटील कार्यरत आहेत जिल्ह्यात 1484 पोलीस पाटलांच्या जागा रिक्त असून शासनाच्या सूचनेनुसार या जागा तात्काळ भरण्यात याव्यात जेणेकरून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था योग्य राहील आणि ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेला मदत होईल यासाठी या जागा भरणे आवश्यक असल्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांची भेट घेऊन सांगितले त्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी पोलीस पाटलांच्या 945 पदांच्या भरतीसाठी कारवाई करण्याचे आदेश दिले असून ही पदे तात्काळ भरण्यात येणार आहेत,
दिनांक 15 फेब्रुवारीला या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध होणार असून अर्जाची छाननी, लेखी परीक्षा आणि पात्र उमेदवारांच्या तोंडी परीक्षा अशी सर्व प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण होणार असून जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांवर पोलीस पाटलांच्या नियुक्ती करण्यात येणार आहेत, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत विविध समस्या आणि प्रश्न मांडून त्या सोडवण्याचा आग्रह केला होता त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत