बीड

बीडमध्ये 14 जिल्ह्यातील कलासाधकांचा कलाविष्कार:संस्कार भारतीचा तीन दिवसीय कलासाधक संगम !

सिनेअभिनेते योगेश सोमण उदघाटक तर संदिप पाठक यांच्या हस्ते समारोप !!

बीड- साहित्य,नाट्य,कला,क्रीडा यासह सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणार्‍या संस्कार भारती च्या वतीने देवगिरी प्रांताचा कलासाधक संगम 2022 हा कार्यक्रम येत्या 23 ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान राजयोग मंगल कार्यालय,आशा टॉकीज जवळ ,बीड येथे होत आहे.जळगाव ते लातूर अशा 14 जिल्ह्यातील देवगिरी प्रांताचे जवळपास एक हजार कलासाधक या तीन दिवसीय सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते होणार आहे .तर समारोप प्रसिद्ध सिनेअभिनेता ,बीड जिल्ह्याचे सुपुत्र संदिप पाठक यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती देवगिरी प्रांताचे प्रांताध्यक्ष भरत अण्णा लोळगे आणि कलासाधक संगम महाव्यवस्थापक तथा जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे यांनी दिली. 
संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून कंकालेश्वर महोत्सव,दीपोत्सव, नटराज पुजन, भारत माता पुजन या सारखे अनेक सांस्कृतिक व नैमित्तीक कार्यक्रम घेतले जातात.तब्बल दहा वर्षानंतर होणार्‍या कलासाधक संगम च्या आयोजनाची संधी यावेळी बीडकरांना मिळाली आहे.नाट्य,कला,साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या निमित्ताने बीड करांना अनुभवायला मिळणार आहे. 
येत्या 23 डिसेंबर रोजी या कलासाधक संगमाचे उद्घाटन चित्रपट नाट्य अभिनेते,दिग्दर्शक तथा संस्कार भारती पश्चिम प्रांताचे कला मार्गदर्शक योगेश सोमण यांच्या हस्ते सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे.यावेळी संस्कार भारती पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे,भाषिप्र संस्थेचे कार्यवाह डॉ हेमंत वैद्य आणि संस्कार भारती पश्चिम प्रांताचे महामंत्री सतीश कुलकर्णी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. 24 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 7 दरम्यान शास्त्रीय संगीत सभा होईल.सकाळी 8 .30 वाजता रंगधारा ( शोभायात्रा) होईल.ही शोभायात्रा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून सुरू होईल ,ही शोभायात्रा सुभाष रोड,माळीवेस,बलभीम चौक,राजुरी वेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संपन्न होईल.यावेळी या ठिकाणी बीड शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.
त्यानंतर कार्यक्रम स्थळी सकाळी 10.30 ते दुपारी 1 .30 पर्यंत नाट्यविधा सादरीकरण संयोजक सुनिताताई घाटे यांच्या संयोजनाखाली होईल.दुपारी 2.30 ते 5.30 दरम्यान विद्यासागर पाटांगणकर यांच्या संयोजनाखाली साहित्यविधा सादरीकरण होईल.सायंकाळी 6.30 ते 8.30 दरम्यान जयंत शेवतेकर यांच्या संयोजनाखाली कंकालेश्वर मंदिर येथे जलाशयातील तरंगत्या रंगमंचावर नृत्यविधा सादरीकरण होईल.रात्री 10 ते 11 दरम्यान कार्यक्रम स्थळी स्थानिक कलावंतांचा कलाविष्कार कार्यक्रम होईल.
रविवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 7.45 दरम्यान शास्त्रीय संगीत सभा आणि सकाळी 9.30 ते 12.30 दरम्यान सतीश महामुनी यांच्या संयोजनाखाली लोककला विधा सादरीकरण होईल.दुपारी 1.30 ते 4.30 दरम्यान संजय जोशी यांच्या संयोजनाखाली संगीतविधा सादरीकरण होईल.कार्यक्रम स्थळी म्हणजेच राजयोग मंगल कार्यालय येथे भव्य रंगावली प्रदर्शन, चित्र प्रदर्शनी आणि प्राचीन कॅमेर्‍यांचे अनोखे प्रदर्शन भरविले जाणार आहे.

25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6.30 दरम्यान या कलासाधक संगम कार्यक्रमाचा समारोप प्रसिध्द सिनेअभिनेते संदिप पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.या कार्यक्रमास संस्कार भारतीचे संघटन मंत्री अभिजित गोखले आणि भाषिप्र संस्थेचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे हे उपस्थित राहणार आहेत.


बीड जिल्हा वासीयांसाठी अनोखी पर्वणी या निमित्ताने असणार आहे,तरी या कार्यक्रमाचा लाभ बीडकरांनी घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने प्रभाकर महाजन, प्रा.स्नेहलताई पाठक, डॉ.विद्यासागर पाटांगणकर, दत्तप्रसाद गोस्वामी, महेश वाघमारे, वासुदेव निलंगेकर, जगदीश पिंगळे, डी.एस. कुलकर्णी सर, कुलदिप धुमाळे, प्रज्ञा रामदासी, सुरेश साळुंके, सुरेश भानप, लक्ष्मीकांत रुईकर, शैलेश पुराणिक, संतोष पारगांवकर, दत्ता घोडके, लक्ष्मीकांत सौंदत्तीकर, गणेश दालखेडकर, सुजित देशमुख, केदारनाथ बहिरमल, गणेश स्वामी, अनुरधा चिंचोलकर, प्रकाश मानूरकर, राहुल पांडव, प्रा.जोगेंद्र गायकवाड, संजय देशमुख, स्नेहा पारगावकर, अनिल कुलकर्णी, मधुरा बाभुळगावकर, स्मिता लिंबगावकर, गौरी देशमुख, सोनल पाटील, महेश देशमुख, रेणुका पाटांगणकर, आनंत सुतनासे, गुरु कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *