बीड

अमृत महाआवास अभियान मध्ये बीड जिल्ह्याचे यश:मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा पुरस्कार देऊन गौरव

बीड, दि.24 :-ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त अमृत महाअवास अभियान 2022-23 अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ व कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले याच कार्यक्रमात आवास योजनेच्या घरकुलांचा उद्दिष्ट प्रमाणे उत्तम कामगिरी केल्याने बीड जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला.

राज्य पुरस्कृत आवास योजना मधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम तृतीय क्रमांकाचा पुरस्कार बीड जिल्ह्याला देण्यात आला सदर पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी स्वीकारला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ चा राज्यस्तरीय शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे तसेच राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर, ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते ‘अमृत महाआवास पुरस्कार-2023’ या पुस्तिकेचे, अभियान पोस्टर, महाआवास त्रैमासिक आणि अभियान गौरवगाथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अमृत महाआवास अभियान संदर्भात राज्य शासनाने केलेली कामगिरी विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.राजेशकुमार आणि महाआवास अभियानाच्या संदर्भातील विस्तृत सादरीकरण ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ.दिघे यांनी केले.

यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *