भूमी अभिलेख विभागाची गट क रिक्त पदे सरळसेवा भरती परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान
बीड, दि.21 भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दि. 9 डिसेंबर 2021 रोजी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार 9 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत उमदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. या अर्जदारांची दि. 28 फेब्रुवारी ते 13 मार्च 2022 या कालावधीत अर्ज भरण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती.
छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपसणी करुन भूमी अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अहर्तेबात प्रमाणपत्र अपलेाड केलेले असून अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील दि. 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा ( Computer BasedTest) दि. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत IBPS कंपनीर्मात महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहेत.
परीक्षेच्य विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https.//mahabhumi.gov.in) वर लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी संबधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी, अशा सूचना औरंगाबाद भूमी अभिलेखचे अनिल माने यांनी केल्या आहेत.
परिक्षा पध्दतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.परिचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिता लिंक दि. 14 नोव्हेंबर 2022 पासून विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे
जात पडताळणी विभागाकडे विहित वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन
बीड, दि. 21 (जि. मा. का.):- जिल्हा जात पडताळणी समिती बीडतर्फे अनु. जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11 वी 12 वी मध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाना-या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडे विहित काल मर्यादेत अर्ज सादर करण्याचे] आवाहन जिल्हा जात पडताळणी समिती यांनी केले आहे.
चालू शैक्षणिक वर्षात विशेष मोहिमेच्या अनुषंगाने 11 वी व 12 वी शाखेतील विद्यार्थ्यांचे महाविद्यालययीन समान संधी केंद्रामार्फत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारुर यांच्यामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीचे 49 अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र समिती बीड येथे दाखल करण्यात आले आहे. 11 वी व 12 वी शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यानी अर्ज सादर करावेत.
विद्यार्थी व पालकांनी विहित कालपर्यादेत समितीकडे अर्ज सादर न केल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जात वैद्यता प्रमाणपत्र मिळविताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, त्यासाठी विहित वेळेत अर्ज सादर करावेत.