कृषी सेवक,ग्रामसेवक आणि शिक्षण सेवकांच्या वेतनात वाढ
राज्य शासन सेवेत कार्यरत कृषी सेवक , ग्रामसेवक आणि शिक्षण सेवकांच्या मानधन / निश्चित वेतनात वाढ करणेबाबत मा.मुख्य सचिव यांचेकडे आयोजित बैठकीचे इतिवृत्त कृषी , पशुसंवर्धन ,दुग्धविकास विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडुन दि.22.10.2022 रोजी महत्वपुर्ण निर्णय निर्गमित झालेला आहे . यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनात चक्क दुप्पट वाढ होणार आहे .
राज्यातील कृषी सेवक , ग्रामसेवक व शिक्षणसेवक तसेच आरोग्य सेवक इत्यादी पदांच्या मानधनांबाबत वाढ करण्याच्या विषयाबाबत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली दि.22.09.2022 रोजी बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीमध्ये वरील नमुद विषयावर सविस्तर चर्चा करुन पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे .सातव्या वेतन आयोगामध्ये देण्यात येणारे किमान वेतन 15,000/- रुपये विचारात घेता कृषी सेवक , ग्रामसेवक व शिक्षण सेवक तसेच आरोग्य सेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे .यामध्ये कृषी सेवक व ग्रामसेवक तसेच शिक्षण सेवक ( प्राथमिक व उच्च प्राथमिक ) यांना सध्या 6,000/- रुपये इतके वेतन निश्चित करण्यात आले होते , यामध्ये वाढ करुन आता या कर्मचाऱ्यांना 16,000/- रुपये सुधारित मानधन निश्चित करण्यात आले आहे .
त्याचबरोबर शिक्षण सेवक ( माध्यमिक ) यांना सध्या 8,000/- रुपये वेतन निश्चित करण्यात आलेले आहेत , यामध्ये वाढ करुन 18,000/- रुपये सुधारित मानधन निश्चित करण्यात आले आहे . तसेच शिक्षण सेवक ( उच्च माध्यमिक ) यांना सध्या 9,000/- रुपये वेतन निश्चित करण्यात आलेले आहेत . यामध्ये वाढ करुन 20,000/- रुपये सुधारित मानधन वाढीलस सदर बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे .यामुळे सदर कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळी सणाच्या मुहुर्तावर वेतनामध्ये दुप्पट वाढ मिळणार आहे .