बीड शहराचा होतोय कायापालट:क्षीरसागर बंधूनी केली वचनपूर्ती
बीड/प्रतिनिधी
रस्ते,वीज आणि पाणी या मूलभूत गरजा अत्यंत महत्वाच्या आहेत,वाढती हद्दवाढ आणि आगामी काळातील लोकसंख्या लक्षात घेऊन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांनी दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आणि आज ते प्रत्यक्षात अंमलात येऊ लागले आहे,बीड शहरातील 16 डीपी रस्त्यांची कामे दर्जेदार करून ते थांबले नाहीत तर आणखी नवीन 15 रस्त्यांची कामे आता होणार आहेत सध्या 12 रस्त्यांची कामे सुरू होत आहेत तर उर्वरित 3 रस्त्यांसाठी पुन्हा प्रस्ताव पाठवला आहे एकंदरीतच बीड शहरातील या होणाऱ्या रस्त्यांमुळे कायापालट होणार आहे
रस्ते झाल्यावर अनेक बदल होणार आहेत,त्या त्या भागात नवीन मार्केट तयार होईल,बाजारपेठ वाढेल आणि विशेष म्हणजे त्या भागातील जमिनीला मोठी किंमत देखील येणार आहे,हजारो बेरोजगार तरुणांना व्यवसाय करता येईल,वाहनांची आणि दळणवळनाची उत्तम सोय होणार आहे,शहरातील होणाऱ्या या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी आणणे हे तसे सोपे काम नाही,ते एका निवेदनाने किंवा भेटीने होत नसते यासाठी सातत्याने पाठपुरावा लागतो,स्थानिक कार्यालय ते मंत्रालय असा प्रवास करूनच हा निधी प्राप्त होतो तो माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड शहरासाठी मिळवला आहे,कामे होताना थोडा त्रास वाटतो मात्र हेच काम पूर्ण होईल तेव्हाच आपल्याला या रस्त्याचा प्रवास सुखकर वाटणार आहे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार बीड शहरातील 12 रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे बीड शहरातील नवीन 12 डीपी रस्त्यांना मंजुरी मिळाली या रस्त्याच्या कामाचा (ऑनलाइन) शुभारंभ आज दुपारी 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत
बीड शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महा अभियान योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 16 रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी 15 रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळावी यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता तत्कालीन नगर विकास मंत्री व आजचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्यातील 12 रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला आहे आज गुरुवारी सायंकाळी 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (ऑनलाईन)रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार असून यावेळी बीडचे पालकमंत्री अतुल सावे,माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे
सदरील कार्यक्रम बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि माजी सभापती,सर्व नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी पार पडणार आहे बीड शहरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर रस्ता,राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल रस्ता,राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम,बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल सिमेंट रस्ता व नाली,कासट ते शहर पोलीस स्टेशन रस्ता,मसरत नगर ते नेत्रधाम-सावरकर चौक रस्ता,शीतल वस्त्र भंडार दोन्ही बाजूचे रस्ते,पेठबीड पोलीस स्टेशन-ईदगाह-नाळवंडी नाका रस्ता,नाळवंडी नाका-पाण्याची टाकी रस्ता,बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा रस्ता,बार्शी रोड मुक्ता लॉन्स-तक्कीया मज्जिद अशा 12 रस्त्यांची कामे आता सुरू होणार आहेत,युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी स्वतः उभा राहून शहरातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करून घेतली आता नवीन 12 रस्त्यांची कामे देखील नागरिकांना अडचण होणार नाही याची काळजी घेऊनच करणार असल्याचे डॉ योगेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे,दिलेल्या शब्दाची पूर्तता करून शहरातील कामांना प्राधान्य दिले जाईल असेही ते म्हणाले,आज होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे