ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:४ टक्के महागाई भत्ता वाढला

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी मोठ्या आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार (२८ सप्टेंबर) महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्के वाढीची घोषणा केली. या निर्णयाचा फायदा सुमारे १.१६ लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, जो गेल्या डझनभर तिमाहींमधील सर्वाधिक आहे. यापूर्वी सरासरी डीएमध्ये केवळ ३ टक्के वाढ करण्यात आली होती, मात्र यावेळी महागाईचा फटका पाहता सरकारने तिजोरी उघडली आहे. आता ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६२ लाख पेन्शनधारकांना ३८ टक्के डीए (महागाई भत्ता) मिळणार आहे. डीएची वाढलेली रक्कम यंदाच्या जुलैपासून लागू होणार असून मागील महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. अशा प्रकारे महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ३४ टक्के करण्यात आला आहे. डीए वाढल्यानंतर कामगारांचे पगार ६८४० ते २७,३१२ रुपयांपर्यंत वाढणार आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) दिला जातो, तर निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलत (DR) दिली जाते. सरकारने या वर्षी मार्चमध्ये डीएमध्ये सुधारणा केली होती, जी नंतर कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या ३ टक्क्यांनी वाढून ३४ टक्के झाली. जर डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्याने डीए सध्याच्या ३४ टक्क्यांवरून आता ३८ टक्के झाला आहे. यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर ३४ टक्के डीए मिळत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *