शेतकऱ्यांनो नुकसान झाले असेल तर 72 तासात तक्रार दाखल करा:दखल घेतली जाणार
बीड, दि. 20 (जि. मा. का.) : जे पीक काढणीला आलेले आहे, त्याचे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पीक काढणीचे नियोजन करण्यात यावे व दरम्यानच्या काळामध्ये पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत अथवा काढणी पश्चात, पाणी साचून जर नुकसान झाले असेल तर खरीप 2022 पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी 72 तासात पीक विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाईन तक्रार करावी. दरम्यानच्या काळामध्ये नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी दाखल करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार करण्यासाठी crop insurance हे ॲप डाऊनलोड करावे किंवा बजाज एलियांज जीआईसी लिमिटेडचे नवीन फार्ममित्र – केयरिंगली योर्स अँड्राइड ॲप डाऊनलोड करावे. कंपनीचा टोल फ्री क्रमांक पुढीलप्रमाणे 1800-209-5959 ई मेल आयडी bagichelp@bajajallianz.co.in
तालुका प्रतिनिधी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे बीड – हनुमंत इन्कार 9922999228, पाटोदा – संपद अश्रुबा गोल्हार 9764552203, शिरुर कासार – गणेश विग्ने 9767355969, आष्टी – संजय पवार 7030241710, गेवराई – रामनाथ ढोबळे 7719959937, धारुर – लखन मारळकर 9325003717, वडवणी – हरी गावाने 8805270533, अंबेजोगाई – रवी सावंत 9975192286, केज – नितीन पवार 8275708297, परळी वैजनाथ – भागवत अरुण डापकर 8830688898, माजलगाव – शेख झाहीर 9595259664, जिल्हा व्यवस्थापक बीड – कविष उमक 7263977766, कुरेशी तौसिफ 8087624759, महावीर चिकटे – 8482819082.
आपल्या तक्रारी तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे कराव्यात. त्यांचा मोबाईल क्रमांक 9860191856 असा आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये वेगाच्या वाऱ्यासोबत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काढणी पश्चात सुकवणी केल्या जाणाऱ्या पिकांचे काढणीनंतर सुरक्षित जागी योग्य व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषि विभागाकडून देण्यात आला आहे.