पोलीस बांधवांनो जपून काम करा
मुंबई: राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारीही करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 116 पोलीस करोनाबाधित झाले आहेत. तर 3 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 211 पोलीस करोनाबाधित झाले आहेत तर यात 249 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 962 पोलीस कर्मचारी करोना संक्रमित आहेत.
आतापर्यंत एकूण 25 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 970 पोलिसांनी करोनावर मात केली आहे. राज्यात करोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यात करोनाविरोधात लढा देणारे पोलीस कर्मचारीही संक्रमीत होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईतील सर्वाधिक 16 पोलीस आहेत. तर नाशिकमधील 3, पुणे आणि सोलापुरमधील प्रत्येकी 2 आणि ठाणे, मुंबई एटीएसमधील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे.