बीड जिल्ह्यात कोरोनाचे 18 पॉझिटिव्ह रुग्ण:नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 608 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 18 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 590 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 1,बीड 2 धारूर 1,गेवराई 1 केज 1 माजलगाव 1 परळी 8 शिरूर 2 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे,या आठवड्यात ही रुग्ण संख्या वाढली आहे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)