बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचे 11 पॉझिटिव्ह रुग्ण:उपचाराधीन रुग्ण संख्या 69

बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 588 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 577 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1,बीड 5, केज 1 परळी 3 शिरूर 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

आज बीड जिल्ह्यातील 1 रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला असून,सध्या जिल्ह्यात 69 रुग्ण उपचाराधीन असून जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्ह दर 1.87 %आहे बरे होण्याचे प्रमाण 97.29%आहे

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे,दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *