ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

बँक कर्मचाऱ्यांने टाळाटाळ केल्यास ग्राहकानाच करता येणार कारवाई

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचे किस्से रोज ऐकायला मिळतात. तुमच्यासोबत असं झालंही असेल की तुम्ही महत्त्वाच्या कामामुळे बँकेत पोहोचलात आणि बँक कर्मचारी तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर यायला सांगतात. तुम्ही वेळेवर पोहोचल्यावर कर्मचारी जागेवर भेटत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे तर बँक कर्मचारी तुम्हाला तुमच्या कामासाठी इकडून तिकडे फिरायला भाग पडतात. तुम्ही याबद्दल तक्रार करू शकता आणि जबाबदारांवर कारवाई करू शकता.

माहितीची कमतरता
ग्राहकांना बँकिंग सेवांशी संबंधित काही अधिकार असतात, ज्यांच्या माहितीच्या कमतरतेच्या अभावी ते लाभ घेऊ शकत नाहीत. बँकेत ग्राहकांना असे अनेक अधिकार मिळतात, जे सहसा ग्राहकांना माहीत नसतात. बँकेने ग्राहकांशी नीट वागणे महत्त्वाचे आहे.

बँकेने योग्य वर्तन न केल्यास ग्राहकांना थेट रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) संपर्क साधण्याचा अधिकार आहे. असे कोणतेही प्रकरण तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता.


बँकेचे ग्राहकांना अनेक अधिकार
बँकेच्या ग्राहकांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत, मात्र त्याबाबत माहिती नसल्याने कर्मचाऱ्यांच्या टाळाटाळला तोंड देत ते शांत बसतात. कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्याला तुमचे काम करण्यास उशीर झाला तर तुम्ही त्या बँकेच्या व्यवस्थापक किंवा नोडल ऑफिसरकडे तक्रार करू शकता. याशिवाय जवळपास प्रत्येक बँकेत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण मंच असतो, ज्याद्वारे तुम्ही तुमची तक्रार सोडवू शकता.

तक्रार निवारण क्रमांकावर
तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल त्या बँकेच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीसाठी तुम्ही बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकता. याशिवाय बँकेचा टोल फ्री क्रमांकावरही समस्या सांगू शकता. याशिवाय काही बँका ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधाही देतात.
बँकिंग लोकपालला समस्या कळवा
बँक कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाबद्दल तुम्हाला बँकिंग लोकपालकडे तक्रार करायची असल्यास, तुम्ही तुमची तक्रार फोन करून किंवा ऑनलाइन पाठवू शकता. तुमची तक्रार ऑनलाईन नोंदवण्यासाठी तुम्ही https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर लॉगइन करू शकता आणि तक्रार दाखल करू शकता. बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १४४४८ असून, त्यावर कॉल करूनही ग्राहक तक्रारी करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *