एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री:देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्यात आश्चर्य चकित करणारे राजकीय गणित आज बघायला मिळाले,राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार म्हणून आतापर्यंत बोलले जात होते मात्र राजभवन येथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे,भाजप शिंदे यांच्या मंत्रिमंडळ मध्ये सहभागी होऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे
काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले होते की जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू असे म्हणले होते
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.”
एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.