एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना होणार:मोठी खेळी होण्याची शक्यता
मुंबई, 22 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे आमदार फोडून मोठा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच गुवाहाटीला दाखल झाले आहे.आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार आहे. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे.
एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे.सर्व आमदारांना गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी CISF च्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळ ते राजभवन प्रवासाला Cisf ची सुरक्षा असणार आहे.