सर्वोच्च न्यायालयात भरती प्रक्रिया सुरु:इच्छुक उमेदवारांसाठी संधी
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India ) भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी यासंधीचा लाभ घ्यावा.
सदर भरती ही ज्युनियर कोर्ट असिस्टंट (ग्रुप-b) या पदासाठी एकूण २१० जागांसाठी ठरविण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
पदवीधर, संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श. प्र. मि आणि संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे गरजेचे
वयाची अट
१८ ते ३० वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण: दिल्ली
शुल्क: General/OBC: ५०० रुपये, SC/ST/PWD/ExSM: २५० रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जुलै २०२२
अधिक माहितीसाठी
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://main.sci.gov.in/ या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.