प्रासंगिक

शनिदेवाची साडेसाती कोणत्या राशीला:कोणत्या टप्यात कोणता लाभ मिळतो

सध्या मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना साडेसाती सुरु आहे. 29 एप्रिल 2022 पासून शनीचं भ्रमण मकर राशीत होतं. आता कुंभ राशीत शनी प्रवेश करणार आहे.

साडेसातीमध्ये अडीच वर्षांचे तीन टप्पे असतात. त्यांना अडीचकी म्हणतात. शनी देव (Shani Dev) हे न्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळं देण्याचं काम ते करतात. त्यामुळेच चांगलं काम करणाऱ्यानं साडेसातीला घाबरण्याची गरज नसते, असं म्हणतात. सध्या ज्या तीन राशींना साडेसाती सुरू आहे, त्यांना काय फळ मिळणार आहे, याबाबत जाणून घेऊ.

मकर रास (Capricorn) : मकर राशीत साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. शास्त्रानुसार, साडेसातीतील शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात अडचणी कमी येतात. जाता जाता शनी देव काही तरी चांगलं फळ देतात. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही.

मीन रास (Pisces) : मीन राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. याला साडेसातीतील उदय चरण असंही म्हणतात. पहिला टप्पा असल्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, करिअर यावर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तसंच संपत्ती व आरोग्य यांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. कोणतीही जोखिम पत्करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.

कुंभ रास (Aquarious) : शनीचं भ्रमण सध्या याच राशीत आहे. कुंभ रासही शनीचीच आहे, मात्र या राशीवरही साडेसाती सुरू आहे. या राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. राशीचा स्वामी शनीच असल्यामुळे या टप्प्यामध्ये फार त्रास होणार नाही, पण चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा नाहीतर शनिदेवांच्या शिक्षेला सामोरं जावं लागेल. कारण दुसरा टप्पा हा साडेसातीचा सर्वोच्च टप्पा असतो. तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारा हा कालावधी असतो. त्याला संयमानं सामोरं जा.

मीन रास (Pisces) : मीन राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. याला साडेसातीतील उदय चरण असंही म्हणतात. पहिला टप्पा असल्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, करिअर यावर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तसंच संपत्ती व आरोग्य यांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. कोणतीही जोखिम पत्करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.

साडेसातीमधील अडचणी कमी करण्यासाठी काही उपाय करता येतात. शनिवार हा शनिदेवांचा वार असल्यानं त्या दिवशी पूजा केल्यानं शनी देव प्रसन्न होतात. त्याशिवाय आणखीही काही उपाय आहेत.

शनीच्या राशी परिवर्तनाने काही राशींना त्रास होऊ शकतो. शनिदेव 5 जूनपासून आपली चाल बदलली असून ते वक्री झाले आहे. शनीचे हे संक्रमण (Shani Vakri) साडेसाती (Sadesati) आणि शनीची महादशा (Shani Mahadasha) सुरु असलेल्या व्यक्तींना प्रभावित करणार आहे.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. लोकांक्षा न्यूज याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *