ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

पंतप्रधान आवास योजनेची रक्कम वाढणार!सरकारची नवी योजना

प्रत्येक माणसासाठी स्वत:चे घर असणे हे मोठे स्वप्न असते. मात्र अनेकदा घरांच्या किंमती किंवा बांधकामाचा खर्च हा अनेकांच्या आवाक्याबाहेरचा असतो.

हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली होती. तुम्ही देखील प्रधानमंत्री आवास योजनेचे (PM Awas Yojana)लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. आता या विशेष योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये अर्थात आधीच्या तिप्पट रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. आता घरे बांधण्याचा खर्च (House Construction Cost)वाढल्याचे समितीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत आता रक्कमही वाढवायला हवी. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत पूर्वीपेक्षा 3 पट जास्त पैसे मिळतील.

खरं तर, यापूर्वी झारखंड विधानसभेच्या अंदाज समितीने राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी चार लाख रुपये देण्याची शिफारस केली होती. समितीचे अध्यक्ष दीपक बिरुआ यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंदाज समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. झामुमोचे आमदार दीपक बिरुआ म्हणतात की, प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. प्रत्यक्षात वाळू, सिमेंट, रॉड, विटा, गिट्टी यांच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमती वाढल्या आहेत.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विनंती

दारिद्य रेषेखालील कुटुंबे ५० हजार ते एक लाख रुपये देऊ शकत नाहीत, असे बिरुआ यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सुरू असलेल्या पीएम आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांची किंमत 1.20 लाखांवरून 4 लाख रुपये करण्यात यावी, जेणेकरून घरे प्रत्यक्ष बांधता येतील आणि लोक त्यासाठी पुढे येतील. त्याचबरोबर राज्याचा हिस्सा वाढविण्याचा विचार राज्य सरकार करू शकते, असेही ते म्हणाले.

अनेकांना घर बांधणे किंवा विकत घेणे शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम आवास योजना (PM Awas Yojana) लागू केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक गरजूंना घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते आहे. सर्वसामान्य माणसाचे जेव्हा घराचे स्वप्न पूर्ण होते तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *