ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त:पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट

केंद्र सरकारने अबकारी कर (एक्साईज ड्यूटी) कमी केल्याने देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे. पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 6 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

यामुळे पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट होईल, असं सीतारमण यांनी सांगितलं.याव्यतिरिक्त निर्मला सीतारमण यांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणाही यावेळी केल्या.

स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त

देशभरात गॅसदरवाढीची (Gas cylinder price) झळ बसलेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी ही घोषणा केलीय. हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळं (Inflation) त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांनाही केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. अशीही घोषणा सीतारामन यांनी आज शनिवारी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *