बीड जिल्ह्यातील आवरगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता पुरस्कार जाहीर
औरंगाबाद,दि.09(विमाका) :-संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत विभागस्तरीय तपासणी समितीद्वारे ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आलेली आहे. विभागस्तरीय तपासणी समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पारितोषिक पात्र ग्रामपंचायतींचा निकाल पुढील प्रमाणे राज्यस्तरीय तपासणी समितीस कळविण्यात आला असल्याचे अनिलकुमार नवाळे, उप आयुक्त (विकास) तथा सदस्य सचिव विभागस्तरीय तपासणी समिती औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
पारितोषिकाचे नाव व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे नाव पुढील प्रमाणे आहे. 1) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम-प्रथम पुरस्कार (विभागून) दाटेगाव, ता.जि.हिंगोली व आवरगाव, ता.धारुर, जि.बीड. 2) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम-द्वितीय पुरस्कार (विभागून) वांगी बु, ता.भूम, जि.उस्मानाबाद व अलगरवाडी ता.चाकूर, जि.लातूर. 3) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम-तृतीय पुरस्कार (विभागून) उटी बु., ता.औसा, जि.लातूर व गौर, ता.पुर्णा, जि.परभणी. 4) विशेष पुरस्कार-सांडपाणी व्यवस्थापन बोल्डावाडी, ता.कळमनूरी, जि.हिंगोली. 5) विशेष पुरस्कार-पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन खेड, ता.जि.उस्मानाबाद. 6) विशेष पुरस्कार-शौचालय व्यवस्थापन हस्ता, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.