राज्यातील शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात मोठा निर्णय:ऑनलाइन प्रक्रिया होणार
राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी आहे. शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आता शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अॅपद्वारे होणार आहेत. सर्व प्रकिया ही ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांचे जुणे धोरण रद्द करण्यात आले असून, आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अॅपद्वारे करण्यात येणार आहोत. आता इथूनपुढे बदल्या या ऑनलाईन होणार असल्याने, शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या अॅपमुळे शिक्षकांची बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यास मदत होणार आहे. नवीन धोरणानुसार आता शिक्षकांना आपल्या बदलीचे आदेश हे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेच मिळणार आहेत. देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते, कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या देखील रखडल्या होत्या, मात्र आता निर्बंध हटवण्यात आल्याने यावर्षी शिक्षकांच्या बदल्या अटळ मानल्या जात आहेत. मात्र या बदल्या पारदर्शक पणे व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने एका मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपद्वारे आता बदल्या होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान शिक्षकांच्या बदल्या या दोन टप्प्यात केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बदलीची ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. शिक्षकांना आपली बदली कुठे झाली तसेच संबंधित शाळेची माहिती ऑनलाईनच उपलब्ध होणार आहे. एवढेच नव्हे तर बदलीचे आदेश देखील ऑनलाईन प्राप्त होणार आहेत. ऑनलाईन बदल्यांमुळे बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यास मदत होईल असा विश्वासा शिक्षण विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अॅपद्वारे करण्यात येणार आहोत. आता इथूनपुढे बदल्या या ऑनलाईन होणार असल्याने, शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.