किराणा मिळणार घरपोच-जिल्हाधिकारी
बीड
संचारबंदीत नागरिकांना अत्यावश्यक सेवेत किराणा सामानाची अडचण येऊ नये म्हणून प्रभाग निहाय व कॉलनी निहाय काही किराणा दुकानांना सकाळी 9 ते 12 दुकान सुरू ठेऊन नागरिकांना घरपोच किराणा समान देण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी रात्री उशिरा काढलेल्या आदेशात म्हटले आहे या दरम्यान होम डिलिव्हरी केली जाईल, असे ऑर्डरमध्ये म्हटले आहे. लोकांना येण्याची मुळीच परवानगी नाही. दुकाने देखील उघडली जाणार नाहीत.
बीड शहरात व परिसरात पूर्णवेळ संचारबंदी लागु करण्यात आली आहे या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळावी यासाठी संचारबंदीत थोडीशी शिथिलता देण्यात आली आहे दूध,भाजीपाला व फळे घरपोच विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर आता किराणा दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे मात्र काही अटी व शर्थी असून शहरात व गावात प्रभाग व कॉलनी निहाय किराणा दुकान उघडतील यासाठी काही कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे त्यांच्या मार्फत दुकानदारांनी नोंदणी करून घ्यावी व घरपोच किराणा पुरवावा ही दुकाने सकाळी 9 ते 12 यावेळेत उघडता येतील बाकी अत्यावश्यक सेवा वगळता कुठल्याही व्यवहाराला परवानगी नाही असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी काढले आहेत