बीड जिल्ह्यात आज 5 तर राज्यात 229 तर देशात 2528 रुग्ण पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 593 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 5 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 588 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात बीड 4,गेवराई 1 असे रुग्ण आढळून आले आहेत
राज्यात कोरोना आटोक्यात
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील नवीन रुग्णसंख्या अडीचशेच्या आत येत असून मृत्यूचे प्रमाण ही कमी झाले आहे.
त्यातच कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 229 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 395 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 22 हजार 360 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के झाले आहे. राज्यात आज 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर 1.82 टक्के झाला आहे.
देशात पुन्हा चिंता:कोरोनाचे २,५२८ रुग्ण आढळले
नवी दिल्ली : होळी साजरी होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. प्रत्यक्षात मृतांची संख्या वाढत आहे.
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,५२८ रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान १४९ लोकांचा मृत्यू झाला, जो कालच्या तुलनेत ८९अधिक आहे.
मात्र, आता देशात केवळ २९ हजार १८१ सक्रिय प्रकरणे शिल्लक आहेत, ही दिलासादायक बाब आहे. सक्रिय प्रकरणांमध्ये तीव्र घट म्हणजे कोरोना बाधित रुग्ण वेगाने बरे होत आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ४.२४ कोटी झाली आहे. त्याच वेळी, संपूर्ण देशात महामारीच्या सुरुवातीपासून एकूण पाच लाख १६ हजार २८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन संसर्ग दराबद्दल बोलायचे तर ते केवळ ०.४० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही एक दिलासादायक बातमी आहे.
(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)