महाराष्ट्रमुंबई

तलाठी आणि पशुसंवर्धन विभागातील पदांची लवकरच भरती:विधानसभेत घोषणा

तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळात मंजुरी:३१६५ पदांची होणार भरती

मुंबई : राज्यात तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठय़ांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार

वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यांच्या निकषांबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाना म्हणून ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा सुरु करण्यात आली आहे असेही मंत्री केदार यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधी सूचनेमध्ये विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *