बीड

शिवसेनेच्या बीड जिल्हा प्रभारी जिल्हाप्रमुख पदी अनिल जगताप यांची निवड

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तिढा अखेर सुटला आहे बीड जिल्हा शिवसेनेच्या प्रभारी जिल्हाप्रमुख पदी अनिल दादा जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे जिल्हाभरात स्वागत केले जात आहे

बीड जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती त्यानंतर जिल्हा प्रमुख पद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून होती शिवसेनेच्या मुखपत्र सामना या दैनिकातून आज ठीक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे यामध्ये बीड जिल्हा प्रमुख म्हणून अनिल दादा जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकात आनंद व्यक्त केला जात असून आगामी नगर परिषद जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अनिल दादा जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *