बीड तालुक्यातील साखरे बोरगावला पूर्णवेळ संचारबंदी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यात साखरे बोरगाव येथे कोरोना विषाणू लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील
प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार साखरे बोरगाव वाणगाव व गोगलवाडी परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे
तसेच बफर झोन (Buffer zone ) म्हणून घोषित करण्यात येत आहेत.वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!