बीड

दुसऱ्या दिवशीही शंभरी पार:बीड जिल्ह्यात आज 122 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1222 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 122 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1100 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 16 आष्टी 16 बीड 51 धारूर 1 गेवराई 12 केज 10, माजलगाव 2 परळी 4 पाटोदा 4 शिरूर 5 वडवणी 1

एका वर्षात कोरोनाने घेतले दीड लाखाच्या वर बळी

नवी दिल्ली, 6 मार्च : देशभरात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेली ताजी आकडेवारी सर्वांची धडकी भरवणारी आहे.मार्च 2020 ते मार्च 2021 या एका वर्षात दीड लाखाच्या वर कोरोनाने बळी घेतले आहेत आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या 1,11, 92, 088 इतकी झाली आहे.

काळजीची बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 18, 327 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 108 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ही गेल्या 36 दिवसांमधील सर्वात मोठी वाढ आहे. सलग चौथ्या दिवशी उपचार करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वात मोठी संख्या

देशातील एकूण रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 05 मार्चला दिवसभरात तब्बल 10 हजार 216 रुग्ण सापडले आहेत. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत ते मुंबई आणि नागपुरात. दोन्ही ठिकाणी एक हजारपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई आणि नागपुरात अनुक्रमे 1,174 आणि 1,225 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.