ऑनलाइन वृत्तसेवा

राज्यांतर्गत वाहन मालकाचा पत्ता बदल तसेच मालकीचे हस्तांतरणासाठी आता ‘एनओसी ‘ची अट रद्द

राज्यांतर्गत वाहन मालकाचा पत्ता बदलण्यासाठी तसेच मालकीचे हस्तांतरणासाठी आता ‘एनओसी ‘ची गरज भासणार नाही. याबाबतचा निर्णय परिवहन आयुक्त ढाकणे यांनी घेतला. तसे आदेश आरटीओ अधिकाऱ्यांना दिले.

वाहनाचा पत्ता आणि मालकी हक्क बदण्यासाठी पूर्वी एनओसीची अट होती. मात्र यातून पैसे खाण्याचे प्रमाण वाढले होते. हा प्रकार रोखण्यासाठी ही अटच रद्द करून टाकली आहे. मात्र, नोंदणीकृत वाहनांसंदर्भात मालकाचा राज्यांतर्गत पत्ता बदलाकरीता तसेच वाहनाच्या मालकीच्या हस्तांतरणासाठी ही तरतूद लागू नाही, असे परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

एका कार्यालयामधून दुसऱ्या कार्यालयात वाहन हस्तांतरण आणि पत्ता बदलण्यासाठी नमुना क्रमांक 28 मध्ये ना-हरकत प्रमाणपत्राची (एनओसी )मागणी केली जाते. तथापि, वाहन 4.0 या प्रणालीवर ज्या वाहनांची माहिती उपलब्ध आहे.

अशा वाहनांच्या बाबत नमुना 28 मधील ना-हरकत मागवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अशा नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करू नये, असे आदेश परिवहन आयुक्तांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहेत.