बीड

बीड जिल्ह्यात आज आढळले 75 कोरोना पॉझिटिव्ह:एकाच ठिकाणी 29 जण बाधीत

बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 779 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 75 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 702 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 15 आष्टी 6 बीड 11 गेवराई 34 केज 6 माजलगाव 3 परळी 1 शिरूर 1

राज्यात आज 8333 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4936 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 लाख 38 हजार 154 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 17 हजार 303 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 4 हजार 936 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
एकूण 2017303 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 67608 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.35% झाले आहे.#CoronaVirusUpdates