बीड

12 कोरोना बाधीत रुग्ण जिल्हा रुग्णालयात

गेवराई, माजलगाव पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण

बीड,दि.२० बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव,आष्टी पाठोपाठ बीड आणि केज तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ इतकी असून जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले ६ व उपचारा दरम्यान मृत झालेली १ रुग्ण वगळता सध्या उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे . गेवराई-२ माजलगाव-३ आष्टी-७ ( १मृत, ६ स्थलांतरित ) बीड -५ केज-२ जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णापैकी आष्टी तालुक्यातील एका वृद्धेचा मृत्यू झाला व सहा जणांना पुण्याला हलविण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांवर जिल्हयात उपचार सुरु असून उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १२ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *