ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

SSC CGL या केंद्र सरकारच्या विभागात 6506 पदांसाठी भरती:पदवीधारकांना संधी

नवीदिल्ली-एसएससी-सीजीएल परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून टीयर 1 ची परीक्षा 29 मे पासून 7 जून 2021 दरम्यान होणार आहे. यासंदर्भात स्टाफ सिलेक्शन कमिटीने (एसएससी) एसएससी सीजीएल 2020 साठी नोटिफिकेशन जारी केलेय.

संगणकावर आधारित होणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार ssc.nic.in या संकेतस्थळावर जाऊन 31 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेत ग्रुप बी आणि सी मधील एकूण 6506 पदं भरली जाणार आहेत. यात ग्रुप बी मधील गॅझेटेड श्रेणीतील 250, ग्रुप बी नाॅन गॅझेटेड श्रेणीची 3513 पदे तर ग्रुप सी मधील 2943 पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता – कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थेकडून कुठल्याही विषयावर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी.

वयोमर्यादा – या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 27 वयोमर्यादा आहे. काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष आहे. तसेच आरक्षित वर्गांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत केंद्र सरकारच्या विविध विभागाती जागा भरल्या जाणार आहेत. त्यात इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साईज, असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर एक्झामिनर, इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर (सीबीआय) यांसह विविध विभाग आहे. अधिक माहितीसाठी ssc.nic.in संकेतस्थळाला भेट