यशाचे दैदीप्यमान शिखर गाठणाऱ्या गुणवंतांचा अभिमान वाटतो- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड- आई-वडिलांच्या कष्टाचे व त्यागाचे फलित मुलांच्या गुणवत्तेवर सार्थ ठरत असते गेल्या आठ नऊ महिन्याच्या काळात अनेक चढ-उतार आपण पाहिले आहेत कोरोणाच्या काळातही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता जोपासत नाविन्यपूर्ण यश मिळवले आहे यशाचं शिखर गाठणाऱ्या या गुणवंतांचा मला सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे

जय संताजी प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व गुणगौरव सोहळा आज श्री रामेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात(काकू मळा) आयोजित करण्यात आला होता प्रारंभी संत जगनाडे महाराज व स्वर्गीय काकू नाना यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर डॉ अरुण भस्मे जगदीश काळे राजेंद्र बनसोडे राजेंद्र भाऊ पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती


कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग क्षीरसागर यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या भाषणानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की बुद्धिमत्तेचे कौतुक व विद्यार्थ्यांचा सत्कार करणे म्हणजे त्याच्यासाठी तो प्रेरणादायी असतो कोरोना चे नियम पाळून मर्यादित कार्यक्रम घेऊन गुणवंतांच्या कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देत आहोत आज ख्रिसमस देखील आहे आणि गीता जयंती देखील आहे यानिमित्ताने साचलेले मळभ दूर करण्याचा योग आला आहे यशाचं शिखर गाठणाऱ्या गुणवंत बद्दल मला सार्थ अभिमान वाटतो आई-वडिलांच्या कष्टाचे व त्यागाचे फलित मुलांच्या गुणवत्तेवर सार्थ ठरत असते गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून संपूर्ण जगानेच अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि जगाच्या वागण्या-बोलण्यात देखील पद्धत बदलली आहे बंधनात राहण्याची वेळ आली आहे संपत येत असलेले वर्ष केवळ जगण्यासाठीच गेले आरोग्याच्या दृष्टीने काळजीने पुढे जाण्यासाठी हे वर्ष उमेदीचे ठरले शिक्षण असेल तरच भविष्य घडवता येते हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे चांगले आणि दर्जेदार शिक्षणासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच नवी पिढी उच्च विचारांची घडत असते आता प्रत्येक क्षेत्र मुलांना खुणावते आहे त्यांना सगळ्या क्षेत्रात संधी आहे या संधीचे सोने करून घ्यायला हवे नवीन आव्हाने पेलण्याचे बळ मुलांमध्ये आले पाहिजे संस्कारक्षम पिढी घडवणे हे भावी काळाची गरज आहे सुविधा उपलब्ध आहेत त्यातून चांगल्याचा स्वीकार करा विज्ञानाचा वापर कसा करायचा हे ठरवण्याची वेळ आली आहे अनेक गोष्टी अशा आहेत तिच्या कल्पनेच्या बाहेर आहेत नवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागली आहे समाजात देखील आता मोठे परिवर्तन होत आहे संत जगनाडे महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांचे विचार घेऊनच आपण सारे जण पुढे जाऊयात असे सांगून या मंदिर परिसरात एक कोटी रुपये किमतीची जागा आपण उपलब्ध करून दिली आहे पुढच्या वर्षी याच जागेल भव्य सभागृहात हा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर इयत्ता दहावी बारावी पदवी पदव्युत्तर परीक्षेत प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आभार कैलास टोणपे यांनी मानले यावेळी तेली समाजातील महिला पुरुष प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत राऊत यांनी केले

सत्कार समारंभ झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांची भेट घेत होता प्रत्येकाला शाबासकी देत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता दोन मुलींनी 99.40%गुण मिळवले त्यांचे व पालकांचे क्षीरसागर बंधूनी कौतुक केले


error: Content is protected !!