ऑनलाइन वृत्तसेवावृत्तसेवा

शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू:BECILमध्ये 727 जागा भरणार

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने (BECIL) नॉन-फॅकल्टी ग्रुप बी आणि सी च्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे निवडलेले उमेदवार एम्स भोपाळ (AIIMS Bhopal) येथे नियुक्त केले जातील. ही भरती अनेक वेगवेगळ्या पदांवर होणार आहे. पीजी विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्णांपासून ते पीजीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुण होतकरु उमेदवारांना या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.

एकूण पदांची संख्या – ७२७

कोणकोणती पदे?
कॅशियर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, अप्पर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर टू अ‍ॅडमिन ऑफिसर, सहाय्यक अभियंता, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्ररीयन, मॅनेजर, डायटिशियन सह अनेक प्रकारची पदे रिक्त आहेत.
नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करुन त्याची संपूर्ण माहिती मिळू शकते. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

असा करा अर्ज :
या रिक्त पदांसाठी, बेसिलच्या वेबसाइटवर becil.com किंवा becilaiimsbhopal.cbtexam.in वर अर्ज करता येईल. पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून देखील अर्ज भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२० आहे. पुढे दिलेल्या ईमेल आयडीवर ईमेल पाठवून या भरतीसंदर्भात कोणत्याही अडचणी किंवा प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

अर्जामधील तांत्रिक अडचणींसाठी – [email protected] व्यतिरिक्त तांत्रिक बाबींसाठी – mahesh [email protected] या इमेलवर संपर्क साधावा. उमेदवारांची निवड चाचणी / मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.