ऑनलाइन वृत्तसेवापुणे

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.

पदवीस्तरावरील अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत दि. 15 डिसेंबरपर्यंत होती. आता अभियांत्रिकीसाठी 22 डिसेंबरपर्यंत, फार्मसीसाठी 21 डिसेंबर, आर्किटेक्‍चर अभ्यासक्रम 20 डिसेंबर, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रम 23 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. या सर्व अभ्यासक्रमास अर्ज करण्याची मुदत आज-उद्या संपणार होती.

मात्र आता मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

पदव्युत्तरस्तरावरील अभ्यासक्रमात एमबीए-एमएमएस प्रवेशासाठी 20 डिसेंबर, एमएई-एमटेक अभ्यासक्रमास 24 डिसेंबर, एमसीए अभ्यासक्रम 23 डिसेंबर, मास्टर ऑफ फार्मसी 23 डिसेंबर, मास्टर ऑफ आर्किटेक्‍चर अभ्यासक्रमास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 23 डिसेंबरपर्यंत मुदत आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.