जनतेने आता सतर्क राहावे बाहेरून आलेल्यावर लक्ष ठेवा-डॉ अशोक थोरात

छुप्या मार्गाने येणार्‍या लोकांवर लक्ष ठेवा;प्रशासनाला कळवा


बीड/प्रतिनिधी

गेल्या 54 दिवसापासून बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळला नाही मात्र काल दोन बाधीत रुग्ण आढळून आल्याने आता जिल्हा वासियांची जिम्मेदारी वाढली असून बाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेऊन प्रशासनाला माहिती द्यावी. येणारा काळ फार कठीण असून स्वत:ची काळजी घेऊन घरात सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरोत यांनी जिल्हावासीयांना केले आहे
गेवराई आणि माजलगाव तालुक्यात दोन कोरोना बाधीत रुग्ण आढळले आणि बीड जिल्ह्यात खळबळ उडाली,गेल्या 54 दिवसात जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता मात्र बाहेरून आलेले दोनजन बाधीत निघाले हे मुंबईहून आलेले असून जिल्ह्यात अनाधिकृत आलेले आहेत. त्यामुळे हॉटस्पॉट, कंटेेटमेंट झोनमधुन छुप्या मार्गाने येणार्‍या लोकांवर प्रशासनाची आता करडी नजर राहणार आहे मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून आपनही आपल्या गावात,गल्लीत,शहरात अशा लोकांवर लक्ष ठेऊन प्रशासनाला सहकार्य करा. यापुढील काळ फार कठीण असून काळजी घेत घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!