उद्या भारत बंदची हाक:दूध फळ भाज्या मिळणेहीअवघड

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान 8 तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.या बंदवेळी दुपारी तीन वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे 8 तारखेला म्हणजेच उद्या सर्व व्यवहार आणि वाहतूक ठप्प राहिल असं बोललं जात आहे.

या सेवा बंद

शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाला ट्रान्सपोर्ट युनियन्सने पाठिंबा दिला असल्याने ८ डिसेंबरला ट्रान्सपोर्ट सेवा बंद असणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाजही सुरू राहणार नाही. शेतमालाविषयक कोणतेही खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार नाहीत. तसेच काही डाव्या कामगार संघटनाही या संपात सहभागी झाल्यामुळे बँकांच्या कामावरही परिणाम होऊ शकतो.


दरम्यान, महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांचा मंगळवार (08 डिसेंबर) रोजी संप करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी व माथाडी कामगार सहभागी होणार असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत माथाडी नेता नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजारसमितीच्या संचालक उपस्थित होते.


error: Content is protected !!