बीडकरांनो कोरोना संपला नाही;आज 74 पॉझिटिव्हची भर:77 जणांना डिस्चार्ज

बीड जिल्ह्यात प्रमाण कमी असले तरी बाधीत रुग्ण आढळून येतच आहेत आज 74 पॉझिटिव्हची भर पडली आहे Active ( उपचार घेत असलेले ) रुग्णांची संख्या अडीच महिन्यानंतर प्रथमच एक हजारच्या आत आली आहे 11 पैकी 9 तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 100 च्या आत असून सर्वात कमी रुग्ण पाटोदा (21) तर सर्वात जास्त रुग्ण बीड तालुक्यात (400) रुग्ण आहेत

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 815 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 74 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 741 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 6, आष्टी 15,
बीड 18, धारूर 4,गेवराई 7 ,केज 1, माजलगाव 4
परळी 5 , पाटोदा 4, शिरूर 5, वडवणी 5 रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 13379 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 11999 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 948 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 77 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 432 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.रुग्ण बरे होण्याचा दर 89.69% आहे


error: Content is protected !!