देशनवी दिल्ली

नवा नियम लागू:ओटीपी कोड दिल्यानंतरच मिळणार घरगुती सिलेंडर

घरगुती गॅसची होम डिलिव्हरी संदर्भातील काही नियमांत १ नोव्हेंबरपासून काही बदल होणार आहेत. घरगुती सिलेंडर्सची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख होण्यासाठी तेल कंपन्यांकडून नवीन एलपीजी सिलेंडरची सिस्टम १ नोव्हेंबरपासून लागू केली जाणार असून तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी होणाऱ्या एलपीजी सिलेंडर नवी प्रक्रिया कशी असेल जाणून घ्या, सविस्तर वाचा.

कोड दिल्यानंतरच मिळणार सिलेंडर

या नवीन प्रणालीला DAC (Delivery Authentication Code) असे नाव देण्यात आले असून यापुढे आता सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे.
आता सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल.

१०० स्मार्ट सिटीजमध्ये लागू होणार नवा नियम

पहिल्यांदा तेल कंपन्या हा प्रयोग १०० स्मार्ट सिटीजमध्ये करण्यात येणार असून त्यानंतर इतर शहरांमध्ये हा नियम प्रणाली लागू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रयोगात तेल कंपन्या 95 टक्के यशस्वी झाल्या आहेत. ही प्रणाली केवळ घरगुती सिलेंडर्सवर लागू करण्यात येणार आहे, कमर्शिअल सिलेंडर्सवर नाही.
जर एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर डिस्ट्रिब्युटरकडे अपडेट केला नसेल, तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक App असेल. ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षणीच तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता आणि ज्यानंतर कोड मिळेल. ज्या ग्राहकांचा पत्ता किंवा मोबाइल क्रमांक चुकीचा आहे, अशांना समस्या निर्माण होऊ शकते. या कारणांमुळे त्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते.