मोराटोरियम प्रकरणात कर्जदारांना दिलासा:हप्तेभरले त्यांनाही कॅशबॅक देण्यात येणार

नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयाने सालटी काढल्यानंतर ताळ्यावर आलेल्या केंद्र सरकारने अखेर मोराटोरियम प्रकरणात कर्जदारांना दिलासा दिला आहे. मोराटोरियम काळातील चक्रवाढ व्याज सरकार भरणार आहे.

ज्या कर्जदारांनी मोराटोरियम काळात हप्ते भरले त्यांनाही कॅशबॅक देण्यात येणार आहे. ज्यांनी मोराटोरियम घेतले नाही त्यांनाही हा लाभ मिळणार आहे.

कोरोना काळात कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सुरूवातीला मार्च ते जून आणि नंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर असा सहा महिन्यांचा मोराटोरियम दिला होता. मात्र या काळातील व्याजावरील व्याज वसूल करण्यात येणार असल्याचे फर्मान सरकारने जारी केले होते.
केंद्र सरकारच्या या निर्णयाला सर्वेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या दोन सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली होती. कर्जदारांसाठी ठोस योजना घेऊन या अशी तंबीच न्यायालयाने दिली होती. न्यायालयाच्या तंबीनंतर वठणीवर आलेल्या केंद्र सरकारने मोराटोरियम काळातील चक्रवाढ व्याजाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. यासंदर्भातील संपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारने आज न्यायालयाला सादर केला.


error: Content is protected !!