शेतकऱ्यांनो पीक नुकसानीची नोंदणी ऑनलाइन(online) करू शकता

बीड- राज्यातील पीक विमा कंपन्यांना दिलेल्या निर्देशानुसार काढणीपश्‍चात नुकसानी संदर्भात विमा कंपनीस शेतकऱ्यांनी द्यावयाच्या पूर्वसूचना संदर्भात ऑनलाईन(online) क्रॉप इन्शुरन्स(crop insurance app) च्या माध्यमातून तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील पूर्व सूचना स्वीकारण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले असून ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले त्याची नोंदणी करायची असेल त्यांनी आता ऑनलाईन नोंदणी करावी जेणेकरून विमा कंपनीकडून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेता येईल

बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी या पिकाचा विमा उतरवलेला आहे आणि अशा अधिसूचित पिकासाठी च्या अधिसूचित क्षेत्रातील शेतात कापणीपासून 14 दिवसाच्या आत गारपीट चक्रीवादळ अतिवृष्टी ढगफुटी व अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झाले असेल तर त्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची पूर्वसूचना कृषी व कल्याण विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या क्रॉप इन्शुरन्स(crop insurance app) च्या माध्यमातून अथवा भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या 1800 1165 15 या टोल फ्री क्रमांकावर विमा कंपनी अथवा संबंधित बँक व कृषी विभागात देण्याची तरतूद आहे असे असले तरी इतर मार्गाने प्राप्त सूचना नाकारता येणार नाहीत त्या अनुषंगाने ऑफलाइन(offline)व ऑनलाइन(online) अशा दोन्ही स्वरूपाच्या पूर्वसूचना स्वीकारून तात्काळ सर्वेक्षण पार पाडण्यात येणार आहे पूर्व सूचना प्राप्त झाल्यापासून दहा दिवसात संयुक्त समिती मार्फत विमा कंपनीमार्फत सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे सर्वसाधारणपणे सध्या स्थितीमध्ये शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करण्याची तयारी करत असल्यामुळे शेतकरी सर्वेक्षणाची वाट न पाहता नुकसानग्रस्त पीक शेतात जास्त दिवस ठेऊ शकत नाही विमा कंपनीमार्फत वेळेत सर्वेक्षण पूर्ण न झाल्यास महसूल कृषी विभाग यांच्यामार्फत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत केलेले सर्वेक्षण विमा कंपनीस ग्राह्य धरावे लागणार आहे सदर परिपत्रकाद्वारे विमा कंपनीस निर्देश देण्यात आलेले आहेत तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील पर्यायांपैकी प्राधान्याने ऑनलाईन व शक्य न झाल्यास ऑफलाइन कार्यपद्धतीचा अवलंब करावा आणि पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना द्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांच्यामार्फत करण्यात आले आहे


error: Content is protected !!