दिलासादायक:आरोग्य प्रशासनाचे यश जिल्ह्यात 9 हजार रुग्ण झाले बरे

बीड-कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा लोकांमध्ये त्याची भयानक दहशत निर्माण झाली होती लक्षणे आढळली तर रुग्ण मानसिकतेत अर्धा गळत होता मात्र बीड जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाने प्रत्येक रुग्णाला धीर देत यातून सही सलामत बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घेतली थोड्या फार चुका झाल्याही असतील पण जिल्ह्यात जवळपास 9 हजार रुग्ण याच लोकांच्या मदतीने बरे झाले हे मान्यच करावे लागेल
आज बीड जिल्ह्यात 11229 एकूण रुग्ण बाधीत संख्या आहे त्यात 8955 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर केवळ 1935 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत इतर गंभीर आजार असणाऱ्या काहींना कोरोनाची लागण झाली व काहींना यात जीव गमवावा लागला असे 399 रुग्ण आहेत जिल्ह्याचा बरे होण्याचा दर 80%पोहचला आहे यामुळे जिल्ह्या वाशियाना मोठा दिलासा मिळत आहे दिवाळी पर्यंत बीड जिल्हा कोरोना मुक्त व्हावा अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स,वार्ड बॉय आणि अन्य सेवा देणारे कर्मचारी यांचे खरोखरच हे यश मानावे लागेल


error: Content is protected !!