बीड

बीडमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसांगराची मोलाची मदत

15हजार कुटूंबाना जीवनावश्यक किटचे वाटप

बीड – कोरोनाच्या लढाईत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी योग्य वेळी बीड मतदार संघातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या 15 हजार सामान्य कुटूंबाना एक महिना पुरेल एवढया जीवनावश्यक वस्तू च्या किट चे वाटप घर पोहोच केले जात आहे. कोरोनाच्या संकटात माजीमंत्री जयदत्त क्षीरसागराची ही मदत लाखमोलाची ठरणार आहे कारण अनेक दानशूर व्यक्ती नी केलेली मदत संपुष्टात येत असताना ही मदत त्यांच्या कामाला येणार आहे
आज बीड मध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यन्त गरीब कुटूंबाना आधार देण्याचे काम केले,भयावह परिस्थिती मध्ये
मदतीचा हात पुढे करत बीड मतदार संघातील 15 हजार कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूची किट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे, दोन महिन्यांपासून हजारो कामगार , मजूर , सामान्य कुटूंब घरामध्ये बसून आहे, हाताला काम नाही अन पोट हातावरचे अशा परिस्थिती मध्ये बीड मधील दातृत्व असणारे अनेक हात मदती साठी पुढे आले, प्रत्येक जण एकमेकाला या कठीण परिस्थितीमध्ये मदतीचा आधार देत होता, गेली 50 दिवस या मदतीवरच हजारो कुटूंब आपला उदरनिर्वाह भागवत होते मात्र पुन्हा लॉक डाऊन वाढल्याने आता काय खायचे अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती, अशा बिकट परिस्थिती मध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 15 हजार अत्यन्त गरीब अन सामान्य कुटूंबाना एक महिना पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तू चे वाटप प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाटप सुरू केले आहे क्षीरसागराची ही मदत लॉक डाऊन मूळे जेरीस आलेल्या कठीण परिस्थितीतिल कुटूंबाना लाख मोलाची ठरली.यावेळी बीड चे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती दिनकर कदम, दूध संघाचे चेअरमन विलासराव बडगे, जगदीश काळे,अरुण डाके, दिलीप गोरे,वैजीनाथ तांदळे,गणपत डोईफोडे,सखाराम मस्के,सुनील सुरवसे,सुभाष क्षीरसागर, गोरख शिंगण,आदी उपस्थित होते,
मुख्यमंत्री सहायत्ता
साठी ही निधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या लढाई साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत करण्याचे आवाहन केले होते, राज्यभर मोठा प्रतिसाद देत सामान्य नागरिकांनीही यासाठी मदत केली , बीड मध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या विविध संस्थेच्या माध्यमातून 10 लाख 500 रु चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केला होता, या पुढे ही सामान्य नागरिकांना मदतीचा ओघ सुरूच राहील असे म्हणत घरा बाहेर पडू नका, सरकारच्या सूचनांचे पालन करा,असे आवाहन करत कोरोना हरेल आपण जिंकू , बीड जिल्हा ग्रीन झोन मध्ये कायम राहील असा विश्वास माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *