आता देशात कुठेही खरेदी करा रेशन- 1 जूनपासून अंमलबजावणी

‘एक देश, एक रेशनकार्ड’ योजना देशभरातच लागू होणार


नवी दिल्ली/वृत्तसेवा
हातावर पोट असणार्‍या लोकांना रेशन पुरवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना आणली आहे. केंद्र सरकारच्या वतीने 1 जूनपासून 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक देश, एक रेशनकार्ड’ ही योजना राबविण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत ही सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लॉकडाऊनमुळे कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक स्थलांतरित होऊ शकतात, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘एक देश, एक रेशनकार्ड’ योजना देशभरातच लागू करण्याची शक्यता विचारात घेण्यास सांगितले होते. त्यामुळे लोकांना सवलतीच्या दरात धान्य मिळू शकणार आहे.या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाचे पात्र लाभार्थी एकच रेशनकार्ड वापरून देशातील कुठल्याही शहरातून योग्य किमतीत धान्य खरेदी करू शकतात. केंद्रीय नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, आतापर्यंत 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची भर यात घातली गेली असून, ओडिशा, मिझोरम आणि नागालँड अशी आणखी तीन राज्येही तयार केली जात आहेत. 1 जूनपासून एकूण 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुरू करण्यासाठी सज्ज असतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!