राज्यातले पहिलेच सुसज्य व पर्यावरणपुरक असे उद्यान बीड नगरीत उभारणार- नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीड दि.24 (प्रतिनिधी)ः- बीड शहरवासियांची अनेक वर्षाची अपेक्षीत असलेली उद्यानाची इच्छा लवकरच पुर्ण होणार आहे. बीडच्या पंढरी नगरीत उभारण्यात येणारे हे उद्यान राज्यातले पहिलेच उद्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.


बीड शहरातील पंढरी नगरीत ओपन पेस असलेल्या ठिकाणी मोठे आणि सर्व सुविधा असणारे उद्यान व्हावे यासाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे वैशिष्यपुर्ण योजनेतून या उद्यानासाठी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जुन 2020 मध्ये राज्य शासनाकडून हा निधी वर्ग करण्यात आला असून यामध्ये सुसज्य आणि पर्यावरणपुरक उद्यान बीड नगरीत दिसणार आहे. येत्या सहा महिन्यात या उद्यानाचे काम पुर्ण करून शहरवाशियांसाठी खुले होणार आहे. या उद्यानाचे वेगळे वैशिष्ट्य असून योगा सेंटर, खुले व्यासपिठ, ओपन जीम, जॉगींन ट्रक यासह उत्तम व्यवस्था असलेले रेस्टारंट देखील असणार आहे. या उद्यानासह बीड शहरात दहा छोट्या गार्डनमध्ये ओपनजीम उभारण्याचे काम सुरू असून ते ही लवकरच पुर्ण होणार असून बीडकरांना परिवारासह निसर्गाच्या सानिध्यात येवून विरगूंळा व्हावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. पंढरी नगरीत उभारण्यात येत असलेले हे उद्यान सुसज्य आणि राज्यातील पहिलेच उद्यान असेल असे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी या जागेची पाहणी करत असतांना सांगितले.


यावेळी नगरसेवक भिमराव वाघचौरे, विनोद मुळूक, अ‍ॅड.महेश गर्जे, विठ्ठल गुजर, कपिल सोनवणे, मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, नाना मस्के याच्यासह नगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!